Video

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

Maharashtra Budget Session: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने सरकारच्या चहापान बैठकीवर बहिष्कार टाकला. अजित पवारांच्या विमान घटनेवर आणि इतर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणारे १५ कलमी पत्र पाठवले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र टिप्पणी करून उत्तर दिले.

Bharat Jadhav

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारने आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. पण या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी नित्य नियमाने बहिष्कार टाकला. बहिष्कार टाकत महाविकास आघाडीने पत्राद्वारे १५ प्रश्न विचारले. परंतु विरोधकांच्या पत्रावर मुख्यत्र्यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीने राज्य सरकारला 15 प्रश्न विचारले. त्यामुळे आगामी अधिवेशन हे विरोधकांच्या आक्रमणाने गाजणार असल्याचे संकेत आहे. महाविकास आघाडीने अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर संशय व्यक्त केला. सरकारला पाठवलेल्या पत्रात याबाबत उल्लेख करण्यात आलाय. "महाराष्ट्राचे पुरोगामी विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात की घातपात याबाबत महाराष्ट्रात संशय असल्याचं म्हटलंय. यासह अल्पसंख्याक शाळा, झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण अशा प्रकारची प्रश्न या पत्रातून करण्यात आली आहे. विरोधकांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं. विरोधकांचे एक सहा पानाचे आणि १८ मुद्द्यांचं पत्र आम्हाला मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या एवढ्या चुका या पत्रात करण्यात आल्या. बातम्यामध्ये आलेले पॅरा आहे तसे यामध्ये टाकण्यात आलेत, जराही बदल करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही, टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

साखर की पिठीसाखर? आरोग्यासाठी काय सर्वाधिक फायदेशीर, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मेळघाटात धक्कादायक प्रकार; दफन केल्यानंतर 23 दिवसांनी मृतदेह काढला बाहेर

Black Tea Benefits: महिनाभर रोज एक कप कोरा चहा प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Black spots on onion: कांद्यावरील काळे डाग ठरू शकतात धोक्याची घंटा; खाण्यापूर्वी या गोष्टी तपासा

SCROLL FOR NEXT