Paranda News SaamTV
Video

MVA News : मविआची डोकेदुखी वाढली; परांड्यात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती?

Paranda Assembly Constituency : परांड्यात ठाकरे गटाकडून रणजीत पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून राहुल मोटे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Saam Tv

परांड्यात ठाकरे गटाकडून रणजीत पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राहुल मोटे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल मोटे यांनी एक मोठं विधान देखील केलं आहे. त्यामुळे परांड्यात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. संभ्रम दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं राहुल मोटे यांनी म्हंटलं आहे. मात्र यावर तोडगा निघाला नाही तर पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखलवा आहे.

विधानसभा निवडणुकीत परांडा मतदारसंघातून महाविकास आघाडीची डोकेदुखी सध्या वाढली आहे. मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी एबी फॉर्म लावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने सध्या परांड्यात सांगली पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता आहे. शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे हा संभ्रम लवकरच दूर होईल असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आता यावर नेमका काय तोडगा मविआकडून काढण्यात येईल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: तुम्हीही रोज करताय का या चुका? हळूहळू हृदयाला पोहोचतंय नुकसान, हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या सवयी जाणून घ्या

Yavatmal Bus Accident: दारव्हा-आर्णी मार्गावर भीषण अपघात! एसटी बसची दुचाकीला धडक; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशाशी स्पर्धा करत वंदे भारतचा अविस्मरणीय प्रवास, श्रीनगर-जम्मू प्रवास फक्त ३ तासांवर, नंदनवनाच्या पर्यटनाला मिळणार चालना

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

SCROLL FOR NEXT