Solapur News SaamTv
Video

Solapur News : मविआचा 'संग्राम मोर्चा'; प्रणिती शिंदेंनी घेतलं खांद्यावर नांगर

MVA Sangram Morcha : खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीकडून सोलापूरात राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी संग्राम मोर्चा काढण्यात आला.

Saam Tv

सोलापूरमध्ये मविआच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात संग्राम मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी खांद्यावर प्रतिकात्मक नांगर घेतलेलं होतं.

महाविकास आघाडीकडून सोलापूरमध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संग्राम मोर्चा काढण्यात आला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या चार हुतात्मा पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला आहे. हातात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे फलक घेऊन शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. प्रणिती शिंदे यांनी देखील खांद्यावर प्रतिकात्मक नांगर घेतलेले दिसून आले आहे. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हा मोर्चा जाणार असून या मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे. या सभेत प्रणिती शिंदे काय बोलतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस, उबाठा, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती दिसून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT