Maharashrtra Politics SaamTV
Video

MVA-Mahayuti : किंगमेकर कोण होणार? मुख्यमंत्रिपदासाठी मविआ-महायुतीत संघर्ष

Maharashtra Vidhansabha Elections : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्ष बघायला मिळत आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये देखील जागावाटपाचा संघर्ष बघायला मिळत आहे. कारण विधानसभा निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी हा संघर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीतजास्त जागा मिळवण्यासाठी आता मित्रांवरच कुरघोडी करण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आकडेवारीचा खेळ निर्णायक भूमिका बजावणार आहे. ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्रिपद अशी भूमिका निकालानंतर समोर येऊ शकते. त्यामुळे आता जास्त आमदार निवडून आणायला जास्त जागा पदरी पडून घेणं गरजेचं आहे. म्हणून किंगमेकर बनण्यासाठी सर्वच पक्षांत संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, महायुतीमधल्या उमेदवारी याद्या जाहीर होताच मोठ्याप्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात 25 ते 30 ठिकाणी नाराजांची बंडखोरीची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. यावर आता महायुती कसा तोडगा काढणार हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhosari Exit Poll : भोसरीचा आमदार कोण? एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार धक्का!

Maharashtra Exit Poll: मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा होणार आमदार? पाहा Exit Poll

Ichalkaranji Exit Poll: शरद पवारांची पावसातली सभा करिष्मा करणार का? पाहा Exit Poll चा अंदाज

Arjun Kapoor: रब राखा! मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुनने 'त्या' खास व्यक्तीसाठी काढला टॅटू, कोण आहे ती?

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT