One Nation One Election Issue SaamTv
Video

One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून सत्ताधारी विरोधकांत जुंपली

Maharashtra Politics : केंद्रीय कॅबिनेट बैठकीत बुधवारी एक देश एक निवडणुकीचा अहवाल मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

Saam Tv

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत बुधवारी एक देश एक निवडणुकीचा अहवाल मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. वन नेशन वन इलेक्शनवरून त्यांना नो इलेक्शन करायचं आहे, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. तर मोदी सरकारला अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांसारखी पद्धत आणायची आहे अस जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. तर दुसरीकडे एक देश एक निवडणूक यात काय चुकीचं आहे. असा उलट प्रश्न महायुतीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळं आता या वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांत चांगलीच जुंपलेली दिसत आहे.

''जे सरकार मणीपुरला पळून जातं त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा यात आश्चर्य नाही. या आडून त्यांना नो नेशन नो इलेक्शन आणायचं आहे. ही त्याची तयारी आहे. मोदी संविधानावर हल्ला करत आहेत.'' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर देशात लोकशाही कायम राहावी यासाठी बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. त्याला संपवण्याचं काम मोदी करत आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांसारखी पद्धत मोदींना भारतात आणायची आहे.'' असं जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, विरोधक टीका करत असतानाच महायुतीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी 'देशात आधी एकच इलेक्शन होतं ते तुम्ही बदललं, एक देश एक निवडणूक यात काय चुकीचं आहे? '' असा उलट सवाल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT