Dhananjay Munde and Pankaja Munde together in Beed saam tv
Video

Beed News: बीडमध्ये बहीण-भाऊ पुन्हा एकत्र, पंकजा मुंडे- धनंजय मुंडे एकाच मंचावर| VIDEO

Pankaja and Dhananjay Munde Seen Together: बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ-बहिण एकत्र दिसून आले. न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते.

Omkar Sonawane

महाराष्ट्र दिनाच्या निमित्त परळी तहसील कार्यालयाच्या मैदानात आज माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. मागच्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने मुंडे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहत नव्हते. तसेच बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह त्याची टोळी ही जेरबंद आहे. यानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक दिवसांपासून ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहत नव्हते.

मात्र, आज महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यानंतर बीड येथील न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मुंडे भाऊ-बहीण एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायची नव्हती असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचे दिसून आले तसेच ते दोघे एकमेकांशी संवाद ही साधत आहे. मात्र त्यांच्यात कोणत्या विषयावर संवाद झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT