Mumbai Pune Expressway  Saam TV Marathi News
Video

Mumbai Pune Expressway : वाहतूककोंडीची कटकट संपणार, मुंबई-पुणे प्रवास ३० मिनिटांनी कमी होणार

Mumbai Pune Expressway Missing Link Update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातील ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल जवळपास पूर्ण झाला. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai–Pune Expressway missing link travel time reduction : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अनेक दिवसांपासून रखडलेला 'मिसिंग लिंक' प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोणावळा-खंडाळा विभागातील टायगर व्हॅलीजवळ उभारण्यात आलेला ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल आहे. हा पूल आता जवळपास पूर्ण झाला आहे. हा पूल जमिनीपासून सुमारे १०० मीटर उंचीवर आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यावर द्रुतगती मार्गावरील घाट सेक्शन टाळता येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. हा १३.३ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

SCROLL FOR NEXT