Highway Traffic Jam News  AI Image
Video

Traffic : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर ५ ते ६ किलोमीटरच्या रांगा, मुंबई - गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी

Mumbai Traffic Rush : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचा प्रवास रखडला आहे.

Alisha Khedekar

दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. मात्र मुंबईकरांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर तसेच मुंबई पुणे जुन्या महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवासाला निघालेले पर्यटक रस्त्यातच अडकून पडले आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यातच शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमधील नागरिकांनी कोकणाला पसंती दिली आहे. त्यामुळे महामार्गावर खासगी गाड्या, एसटी बस आणि इतर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सुट्ट्यांमुळे कोकणातील पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढत आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही वाहनचालकांना बराच वेळ थांबावे लागत आहे.

एकीकडे दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक उत्साहाने घराबाहेर पडले आहेत, तर दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या प्रवासाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रशासनात मोठा भूकंप! 12 IPS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कोणत्या जिल्हयात नियुक्ती?

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी; ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

MP Resigns: मोदी सरकारमधील मंत्र्यानं खासदारकीचा दिला राजीनामा; काय आहे कारण?

Wedding Blouse Designs: लग्नसराईसाठी साडीवर ट्राय करा 'या' ट्रेंडी युनिक डिझाईन्स, खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Kids Health : लहान वयात मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; मधुमेह, हृदयरोगासह गंभीर आजारांचा धोका, आजच करा 5 महत्त्वाचे बदल

SCROLL FOR NEXT