Panvel Exit Closed Saam Tv
Video

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेववरील पनवेल एक्झिट उद्यापासून ६ महिन्यासाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Panvel Exit Closed: कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याच कामामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेववरील पनवेल एक्झिट मार्ग ६ महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Priya More

महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा ११ फेब्रुवारीपासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झिट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

- यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोनफाटा (कि.मी. ९.६००) येथे डावीकडे वळण घेऊन एनएच ४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे.

- तसंच, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण- शिळफाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल -सायन महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एन.एच ४८ महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT