E-Water Taxi SaamTv
Video

E-Water Taxi : देशातली पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत; लवकरच सुरू होणार सेवा, पाहा Video

Mumbai Water Taxi : मुंबईकरांच्या सेवेसाठी आता लवकरच इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. देशातली ही पहिलीच ई-वॉटर टॅक्सी असणार आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ही टॅक्सी सुरू करण्यात आली आहे.

Saam Tv

देशातली पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गेट वे ऑफ इंडिया ते जेएनपीटीदरम्यान ही टॅक्सी चालवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाचीच बातमी आहे.

मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता जलमार्ग वाहतूकीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी वॉटर टॅक्सी आणि रोपैक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली. मात्र पेट्रोल - डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरामुळे मुंबईकरांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. याच पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची संकल्पना पुढे आली आहे. या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची लांबी १३.२७ मीटर इतकी असणार आहे. तर रुंदी ३.५ मीटर असेल. या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमध्ये एकावेळी २५ प्रवासी बसू शकतील. याचा वेग १४ नॉट्स इतका असणार आहे. इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची बॅटरी ६४ किलोवॅटची असणार आहे. म्हणजे साधारण ४ तास ही बॅटरी चालू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT