Borivali Best Bus Accident 
Video

Best Bus Accident: बोरिवलीत बेस्ट बसने चिमुरडीला चिरडलं, मुलीचा जागीच मृत्यू

Borivali Best Bus Accident: बेस्ट बसच्या धडकेत एका चिमुरडीचा मृत्यू झालाय. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे, साम प्रतिनिधी

बोरिवली पूर्वेतील राजेंद्र नगरमध्ये एका बेस्ट बसने ३ वर्षाच्या चिमुरडीला चिरडल्याची घटना घडलीय. राजेंद्र नगरमध्ये हा अपघात घडलाय. एका लहान मुलीला बेस्ट बसने धडक दिली. यात मुलीचा जागीच मृत्यू झालाय. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाचा तपास करत आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत पावलेल्या मुलीचं नाव मेहक खातून शेख आहे. महक आपल्या भावासोबत बोरिवली पश्चिमेकडे जाण्यासाठी राजेंद्र नगर पुलाच्या पूर्वेकडून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या बसने महकला धडक दिली. या अपघातात तीन वर्षाची महक गंभीर जखमी झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी जखमी झालेल्या महकला बोरिवली पश्चिमेकडील रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधी महकचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी कस्तुरबा मार्क पोलिसांनी बेस्ट बस चालकाला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

रस्ता ओलांडत असताना महक बसच्या पुढच्या चाकाखाली आली. त्यात ती गंभीर जखमी झाली. राजेंद्र नगर येथे दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बेस्ट बसचा ७४९१ क्रमांक आहे. (MH-03-CV-7424) नंबर असलेली बस बोरीवली स्टेशन पूर्वेकडून मागाठाणे डेपोच्या दिशेने A-301 मार्गावरून जात होती. ही बस कंडक्टरशिवाय चालवण्यात येत होती. अपघाताप्रकरणी बस चालक ४८ वर्षीय प्रकाश दिगंबर कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची घटना घडली तेव्हा चालक कांबळे यांना रस्त्यावर मुले आल्याचं दिसले नाही. त्यामुळे बसच्या पुढील डाव्या टायरच्या खाली तीन वर्षाची मुलगी सापडली. त्यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. धर्मेश संखे यांनी दुपारी १:१५ वाजता तिला मृत घोषित केले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

५ वर्षात, ८३४ बेस्ट बसचे अपघात

मागील ५ वर्षांमध्ये बेस्ट बसचे ८३४ अपघात झाल्याची घटना घडलीय. यात ८८ जणांचा मृत्यू झालाय. मरणांकत आणि जखमींना एकूण ४२.४० कोटी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. मागील पाच वर्षात १४ चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT