Mumbai Monorail Stuck Saam tv news
Video

मोनो रेलमध्ये २०० प्रवासी अडकले; प्रवाशांचा श्वास गुदमरला, भरपावसात रेस्क्यू ऑपरेशन, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Monorail Stuck: मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. चेंबूर–भक्ती पार्क मार्गावरील मोनोरेल अचानक बंद पडल्याने तब्बल २०० प्रवासी गाडीत अडकले.

Bhagyashree Kamble

मुंबईत मुसळधार पावसामुळे चेंबूर–भक्ती पार्क मार्गावरील मोनोरेल अडकली.

गाडीत तब्बल २०० प्रवासी अडकले होते.

महापालिकेने ३ क्रेनच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले.

या दरम्यान एका प्रवाशाचा श्वास कोंडून तो बेशुद्ध पडला.

मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. चेंबूर-भक्ती पार्क मार्गावरील मोनोरेल अचानक बंद पडल्याने तब्बल २०० प्रवासी गाडीत अडकले. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यासाठी ३ क्रेन बोलावण्यात आल्या. क्रेनच्या सहाय्याने प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

मोनो रेलमध्ये अडकल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रवाशांचा श्वास कोंडला. काही प्रवाशांनी मोनो रेलची काच तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोनो रेलच्या आत एक प्रवासी बेशुद्ध होऊन पडला. मोनोरेलच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT