Mumbai Metro Line 4 crack Saam TV Marathi
Video

Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

Mumbai Metro Line 4 cracks : मुंबईतील घाटकोपर आर सिटी मॉलसमोर मेट्रो लाईन ४ च्या बांधकामात मोठ्या भेगा आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Metro Line 4 crack inspection news : मुंबईतील मुलुंड विभागातील मेट्रो दुर्घटनामध्ये एकाचा बळी गेला ही घटना ताजी असताच अजून एक व्हिडिओ समोर आलेला आहे. घाटकोपर आर सिटी समोरील मेट्रो ४ या ठिकाणची पाहणी केली असता या ठिकाणी मेट्रोच्या कामाला मोठ्या भेगा पाहायला मिळाल्या. या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, तसेच आर सिटी मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्याच्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना ही होऊ शकते.

आर सिटी मॉलसमोर मेट्रो स्थानकाच्या पिलरला एक नव्हे तर तीन जागी क्रॅक झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या क्रॅकमुळे थोड जरी बांधकाम खाली पडलं तरी मोठं नुकसान होऊ शकते. एका नागरिकाकडून व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. एल.बी.एस. रोडवरील आर-सिटी मॉलजवळ मेट्रो लाईन ४ च्या सुपरस्टक्चर बीममध्ये ‘मॅक्रो क्रॅक्स’ दिसून आल्याची माहिती मिळाली. मेट्रो लाईन ४ च्या सर्व बांधकामाची तपासणी, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे पालिका प्रशासनाचे आदेश दिले आहेत. मुंबईत मेट्रोच्या कामांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT