Mumbai manhole death contractor detained by police : मुंबईतील सांताक्रुझ पूर्वेला मॅनहोल साफ करताना संतोष काष्टे नावाच्या कामगाराचा मृत्यू झालाय. तर, अजय नावाचा दुसरा कामगार गंभीर जखमी झालाय. धक्कादायक बाब म्हणजे काम देणारा खासगी कंत्राटदार असून, तो पालिकेचा निवृत्त कर्मचारी आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात कंत्राटदार विलास जाधव याला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सांताक्रूझ पूर्वेच्या व्हीएन देसाई रुग्णालयाशेजारील रस्ता क्रमांक आठवरील मॅनहोलमध्ये साफसफाईचं काम करताना संतोष काष्टे नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. याच परिसरातील एका इमारतीत तो राहत होता. अजय नावाचा आणखी एक कामगार या मॅनहोलमध्ये उतरला होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पालिकेचा निवृत्त कर्मचारी हा कंत्राटदार असल्याचे सांगण्यात आले. पालिकेचा निवृत्त कर्मचारी कंत्राट कसं घेतो, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला. खासगी कंत्राटदार जाधव याला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.