मुंबईच्या हार्बर मार्गावरील महिला डब्यात छेडछाडीच्या प्रकारानंतर कुर्ला स्थानकात आरोपीला RPFच्या ताब्यात देण्यात आलं. saam tv
Video

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

Mumbai Harbour Line ladies coach harassment incident : मुंबई उपनगरीय लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

Nandkumar Joshi

मयूर राणे, मुंबई | साम टीव्ही

मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशांची एका तरुणाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाच्या या कृत्यानं भेदरलेल्या महिला प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. कुर्ला स्थानकात लोकल थांबल्यानंतर सहप्रवासी आणि फलाटावरील प्रवाशांनी आरोपी तरुणाला पकडलं. त्यानंतर त्याला बेदम चोप दिला. आरोपीला कुर्ला स्थानकातील रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोपी तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

कुर्ला स्थानकात आरोपी तरुणाला चोप दिल्यानंतर त्याला आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आरोपीला आरपीएफच्या ताब्यात दिल्याचे दिसते. काही प्रवाशांनी या आरोपीला पकडले आहे. पण आरोपी काही केल्या त्या सर्वांना ऐकत नाही. जीन्यावरून उतरताना त्याला अक्षरशः फरफटत नेल्याचे व्हिडिओत दिसते. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. 'चोर तर चोर वर शिरजोर' या म्हणीप्रमाणे हा आरोपी तरूण 'भाई, मुझे बचा लो' अशी ओरड करताना या व्हिडिओत दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

SCROLL FOR NEXT