Mumbai Local Video Viral saam tv
Video

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

Mumbai Local Video Viral : मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

मुंबईतील लोकलमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय.. अंधेरीहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडल्याचं कळतंय. अंधेरी फलाट क्रमांक चारवर काही महिला लोकलमध्ये चढल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हाणामारी झाली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कठोर उपाययोजनांची मागणी प्रवाशांनी केली आहे.

मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रवाशांची तुफान गर्दी होते. या गर्दीत रेटारेटी आणि धक्काबुक्की होत असते. काही प्रवाशांकडून दरवाजा अडवला जातो. यावरून वाद होतात. कधीकधी हे शाब्दिक वाद थेट हाणामारीपर्यंत जातात. महिलांच्या डब्यातही हाणामारी होते. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. अंधेरी-विरार लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. महिलांच्या डब्यात दोन गटात हाणामारी झाली. अंधेरीच्या फलाट क्रमांक चारवर काही महिला लोकलमध्ये चढल्या. त्यानंतर वाद झाला. या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT