Mumbai Central Railway signal failure between Mulund and Kanjurmarg saam tv
Video

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंब; कल्याण स्थानकात येणाऱ्या गाड्या १ ते दीड तास उशिराने

Mumbai Local Train Update : मुलुंड आणि कांजूरमार्गदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावत असून कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढलीय.

Bharat Jadhav

मुलुंड आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या तांत्रिक बिघाडाचा फटका लोकल गाड्यांसह एक्स्प्रेस गाड्यांनाही बसला असून, सर्वच गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह हजारो प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

या बिघाडामुळे कल्याण रेल्वे स्थानकात येणाऱ्या गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने धावत असल्याने स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. गाड्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर उद्घोषणांच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती दिली जात असून, सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करून रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Saree Colours: प्रत्येक महिलेवर खुलून दिसतील साडीचे हे ७ सुंदर रंग; साडी खरेदी करताना लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: राज्य मंत्रिमंडळ बैठक वादळी ठरण्याची शक्यता

मुलीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून बापानेच आवळला गळा; हत्येनंतर उरकले अंत्यसंस्कार, गुप्त माहितीमुळे बिंग फुटले

Bed Sheet Fitting Tips: बेडवर हॉटेलसारखी परफेक्ट चादर कशी घालावी? अंथरूणाची चादर न चुरगळता नीट टाकण्याच्या सोप्या टिप्स

Mumbai Railway Accident: 15 ते 20 फूट फरफटत नेलं; एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT