Western Railway  Saam Tv
Video

Mumbai Local Video : सकाळी हार्बर, आता पश्चिम रेल्वे; लोकलसेवा विस्कळीत, प्रवाशांची रूळावरून पायपीट

Western Railway Local Services Disrupted: हार्बर रेल्वे मार्गानंतर आता पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Priya More

हार्बर रेल्वे मार्गानंतर आता पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. गेल्या ४५ मिनिटांपासून पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेट ते विरार या अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद आहे.

पश्चिम रेल्वेच्या धिम्या मार्गावर देखील चर्चगेटच्या आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसेवा उरिशाने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची धिम्या मार्गावरील वाहतूक देखील १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी झाली आहे.

रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी लोकलमधून खाली उतरून ते पटरीवरून चालत जात आहेत. अद्याप पश्चिम रेल्वेकडून रेल्वे स्थानकांवर याबाबत कोणतीही अनाऊंसमेंट करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवासी लोकलची वाट पाहत उभे राहिलेले दिसत आहेत. दुरूस्तीचे काम किती वेळामध्ये पूर्ण होईल याबाबत देखील प्रशासनाकडून अद्याप काहीच सांगण्यात आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai-Pune : अंधाऱ्या बोगद्यातून वाट काढत पोहचा 'या' धबधब्यावर, मुंबई-पुण्याजवळच पाहाल हे आरस्पानी सौंदर्य

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT