Ro-Ro Service Saam Tv
Video

Ro-Ro Service: मुंबई -कोकण रो-रो सेवा सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर, तिकीटाचे दर पाहून डोळे फिरतील | VIDEO

Kokan-Mumbai Ro-Ro Service Ticket Price for Holi: कोकणवासियांसाठी दिलासादायक ठरणारी रोरो सेवा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रो-रो सेवेचे तिकीटदर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.

Siddhi Hande

1 मार्चपासून रो-रो सेवा सुरू होणार आहे. रोरो सेवेचे तिकीटदर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. रोरो सेवेचे तिकीट प्रतिप्रवासी 3 हजार ते 9 हजार रुपयांपर्यंत आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. बस आणि रेल्वेच्या तुलनेत हा प्रवास महाग असल्यानं नक्की ही सेवा कोणासाठी असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी केला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना, जाहीर दरांमुळे अपेक्षाभंग झाल्याची भावना कोकणवासीयांनी व्यक्त केलीये.

रोरो सेवेचे तिकीट दर

इकोनॉमी- ३ हजार

प्रिमियम इकॉनॉमी- ५ हजार

बिझनेस क्लास-७ हजार रुपये

फर्स्ट क्लास-९ हजार रुपये

बसचे दर हे रोरो सेवेपेक्षा खूप कमी आहे. दादर ते सिंधुदुर्ग बसचे दर २ हजार रुपये आहे. तर रेल्वेचे तिकीट दर १,२७७ ते २,८२७ रुपयांपर्यंत आहेत. यापेक्षा दुप्पट तिप्पट दर रोरो सेवेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT