Mumbai-BKC Rain Saam TV
Video

Mumbai : मुंबईत पावसाला सुरुवात! वांद्रे, बीकेसीमध्ये मुसळधार | VIDEO

Mumbai-BKC Rain Update: मुंबई शहरात काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाला आज सकाळपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. समुद्राला उधाण आल्यामुळे उंचच उंच लाटा उसळणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई शहरात काल रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती परंतू, आज अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. वांद्रे बीकेसी, सांताक्रूझ परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. पावसामुळे काही भागांत वाहतूक संथगतीने सुरू असून, सकाळच्या कामाच्या वेळेत नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

समुद्रालासुध्दा आज उधाण येणार आहे. उंचच उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे हवामान विभागाकडून किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT