A car being swept away by strong floodwaters in Vasai East crashes into a bridge pillar, leading to the collapse of a small pedestrian bridge amid heavy Mumbai rains. Saam Tv
Video

मुसळधार पावसाचा हाहाकार; पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या कारची पुलाच्या पिलरला धडक, पूल कोसळला|VIDEO

Car Swept Away In Mumbai Floods Video: मुंबईत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वसईत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कारची पुलाच्या पिलरला धडक बसून पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

वसई पूर्वेकडच्या राजवली वाघराहाळ पाडा येथील नाल्यामध्ये कार वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे. कारमध्ये एक व्यक्ति बसलेली होती.

पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की या कारला दूरपर्यंत वाहून नेले गेले याच दरम्यान पादचाऱ्यांसाठी बांधलेला एक छोटा पूल देखील कारच्या धडकेमुळे तुटलेला आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्कतेची भूमिका घेत या गाडीला काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू केले आहेत. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पाण्याचा निचरा या व्यवस्थेबाबत करण्यात आलेले दावे प्रत्यक्षात मात्र अपुरे ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT