Mumbai Central Railway saamtv
Video

Mumbai Rain : मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला, लोकल २० मिनिटे उशिराने

Heavy rain returned to Mumbai : मुंबईत बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Local News : बुधवारी सकाळपासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पाऊस आज सकाळपासून धो धो कोसळत आहे. अंधेरी, बिकेसी, कुर्ला, दादर, घाटकोपरमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. मध्य रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर हार्बर मार्गावर लोकलची सेवाही विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावारील डाऊन लोकल १० मिनिटे उशिराने धावत आहे.

मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण सकाळीच मुंबई लोकल विस्कळीत झाली आहे. कल्याण ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहे. सकाळी 6.55 मिनिटांच्या सुमारास सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल 5-10 मिनिटे थांबून होती. ही लोकल का थांबली होती याचं कारण कळालेलं नाही. मुंबई आणि उपनगरात काल रात्रभरपाऊस पडत होता. त्यामुळे तांत्रिक कारणाने लोकल उशिरा धावत असल्याचं सांगितलं जातंय. अद्यापही मुंबईची लोकल उशिराने धावत आहे.

सांगलीत गेल्या पाच दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी.

गेल्या पाच दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली अचानकपणे पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून पावसाने उघडीत दिली होती. मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पुन्हा एकदा पावसाची आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT