Mumbai Goa Mahamarga Saam TV
Video

Mumbai - Goa Highway : रायगडमध्ये पावसाचं थैमान; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी | VIDEO

Raigad Heavy Rain : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.घाट आणि अरुंद मार्गांवरून वाहने संथ गतीने चालत आहेत, त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि चिखल साचल्यामुळे अनेक वाहने अडकली असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.घाटमाथ्यांवर आणि अरुंद रस्त्यांवरून वाहने संथ गतीने पुढे सरकत असून, काही ठिकाणी वाहने तासन्तास रांगेत अडकून पडली आहेत.

पावसामुळे रस्त्यांची अवस्था खडतर झाली आहे, त्यामुळे वाहनचालकांच्या त्रासात अधिकच वाढ झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सततच्या पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT