Mumbai Goa Highway saam TV
Video

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

Hatkhamba Village : मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीत LPG गॅस टॅंकरचा अपघात झाला आहे. हातखंबा गावाजवळ पुलावरुन टॅंकर खाली कोसळला.सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. एलपीजी गॅसचा एक मोठा टँकर पुलावरून खाली कोसळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर टँकरमधील गॅस दुसऱ्या सुरक्षित टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.सावधगिरीचा उपाय म्हणून हातखंबा गावातील वाणी पेठ परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, या अपघातामुळे गेल्या ९ तासांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांनी केली मुंबईला जाण्याची घोषणा

Tomato Soup Recipe: घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चविष्ट टोमॅटो सूप, वाचा सोपा रेसिपी

Heart Attack : दिवसभरात किती तेल खावं? प्रमाण ओलांडलं तर वाढतो हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT