Heavy traffic on Mumbai-Goa Highway near Mangaon as Diwali travelers head to Konkan. Saam Tv
Video

Mumbai Goa Highway: दिवाळीच्या गर्दीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; माणगाव, इंदापूर परिसरात वाहनांच्या रांगा|VIDEO

Mumbai-Goa Highway Diwali Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशीही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यातील कोकणवासी मोठ्या संख्येने गावाकडे रवाना होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहर परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहनांचा वाढता ताण आणि अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक झाली असून, माणगाव शहरात पोलिसांना कोंडी सोडवण्यासाठी अक्षरशः दमछाक होत आहे. वाहतूक कोंडीमुळे कोकणवासीयांच्या प्रवासात विलंब होत असून, मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

SCROLL FOR NEXT