Mumbai Goa Highway Nagothne Bridge  saam tv
Video

VIDEO : पुलावरील रस्त्याला भेगा, एका बाजूच्या भिंतीला तडे...मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास धोकादायक

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील पुलाचा एका बाजूचा काही भाग बाहेर आणि काही भाग आतमध्ये आला आहे. त्यामुळे हा पूल सध्या धोकादायक अवस्थेत दिसून येत आहे.

Saam Tv

सचिन कदम, साम टीव्ही | रायगड

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत आहात किंवा येत्या काही दिवसांत करणार असाल तर, थोडं सतर्क राहाल! कारण रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे या महामार्गावर असलेला उड्डाणपूल धोकादायक झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरील रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते. आता तर या पुलाचा मातीचा भराव खचत असल्याचे दिसते आहे. साम टीव्हीचे बातमीदार सचिन कदम यांनी या पुलाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.

पुलाच्या एका बाजूचा जो भाग आहे, त्याला अगदी वरच्या बाजूपर्यंत तडे गेले आहेत. प्लास्टरचा काही भाग बाहेर आला आहे. त्याच्या बाजूलाच मोठे खिळे लावले आहेत. पण तरीही पुलाची प्लास्टर केलेली एका बाजूची भिंत एका लेव्हलला नाही. या पुलासाठी टाकलेला मातीचा भराव खचत असल्याचे दिसते आहे. या पुलाचे काम करणारे ठेकेदार किंवा संबंधित सरकारी विभागाचे अधिकारी यावर तात्पुरती मलमपट्टी करताना दिसून येतात. पण त्यावर कायमस्वरुपी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Maharashtra News Live Update: पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात दुकानांना भीषण आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT