mumbai Goregaon building Fire news  saam tv
Video

मुंबईत इमारतीला आग, घाबरलेल्या दोघांनी खिडकीतून मारली उडी, सुदैवानं....| VIDEO

Mumbai Building Fire : मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीला आज, बुधवारी दुपारी आग लागली. जीव वाचवण्यासाठी दोघांनी पाचव्या मजल्यावरील खिडकीतून खाली उडी मारली. सुदैवाने ते दोघेही चौथ्या मजल्यावरील गॅलरीत पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.

Nandkumar Joshi

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीला आग लागल्याने खळबळ उडाली. शालीमार मिरॅकल इमारतीला आग लागली. यावेळी जीव वाचवण्यासाठी दोन जणांनी इमारतीच्या खिडकीमधून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं.

गोरेगाव पश्चिमेला दुपारी साडेबाराच्या सुमारास एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली होती. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे इमारतीत असलेल्या लोकांची स्वतःला वाचवण्यासाठी धावपळ उडाली. काही वेळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. दोन जणांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारली. सुदैवाने उडी मारल्यानंतर ते दोघे चौथ्या मजल्यावरील गॅलरीत पडले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ज्या दोघांनी खिडकीतून उडी मारली आणि गॅलरीत पडले, त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून अवघ्या तासाभरात ही आग आटोक्यात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT