साईबाबा चरणी एका भाविकानं लाखमोलाचं घड्याळ अर्पण केलंय.  saam tv
Video

Shirdi Sai Baba : साईचरणी 94 लाखांचं घड्याळ! 18 कॅरेट सोनं, शुद्ध चांदी

shirdi sai baba gold watch worth 94 lakh : मुंबईतील एका भाविकानं साईचरणी तब्बल ९४ लाख ८६ हजार रुपये किंमतीचं सोने-चांदीचे घड्याळ अर्पण केलंय. या भाविकाचं नाव उघड केलं नाही.

Nandkumar Joshi

सचिन बनसोडे, शिर्डी | साम टीव्ही

शिर्डीत साईबाबांच्या चरणी एका भाविकाने तब्बल ९४ लाख ८६ हजार रुपये किंमतीचं सोन्याचं घड्याळ अर्पण केलं आहे. १८ कॅरेट सोनं, शुद्ध चांदी आणि रंगीत खड्यांपासून हे आकर्षक घड्याळ तयार केलं आहे. भाविकाच्या विनंतीवरुन त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे.

साईबाबांवर असलेल्या अपार श्रद्धेपोटी मुंबईतील या भाविकानं हे लाखमोलाचं घड्याळ चरणी अर्पण केलंय. या मौल्यवान घड्याळासाठी ६६९ ग्रॅम 18 कॅरेट सोनं, ३१९ ग्रॅम शुद्ध चांदी आणि रंगीत खड्यांचा वापर करण्यात आला आहे. मौल्यवान धातू आणि रंगीत खड्यांच्या सुरेख संयोजनातून साकारलेले हे घड्याळ, कलात्मकतेमुळे विशेष आकर्षण ठरत आहे.

साईबाबांच्या चरणी भाविकांकडून 3 सोन्याची नाणी आणि चांदीच्या विटा

साईबाबांवरील श्रद्धेतून देशभरातील साईभक्त भरभरून दान देत असतात. देहरादून येथील साईभक्त सुरेंद्र कुमार गोयल यांनी साईचरणी ३० ग्रॅमची ३ सोन्याची नाणी अर्पण केली. त्याची किंमत ४ लाख १७ हजार रुपये इतकी आहे. हैदराबाद येथील साईभक्त डॉ. जी. हरीनाथ रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबानं १ किलो ३०१ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटा साईचरणी अर्पण केल्या आहेत. देणगी स्वीकारल्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या दोन्ही देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीआधीच 8 आमदारांचं तिकीट कापलं; दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Mhauli Ghat Road: माऊली घाटातून पंढरीचा मार्ग सुकर! ३१ वर्षांची प्रतीक्षा संपणार, वारकऱ्यांसाठी नवा रस्ता होणार तयार

Mumbai police : आजारपणाच्या वेदना असह्य, पोलीस शिपायाने टोकाचा निर्णय घेतला; २ चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले

Winter Travel : गुलाबी थंडीत आवर्जून फिरा महाराष्ट्रातील 'ही' ७ सुंदर ठिकाणे, एकदा गेलात तर परत यावं वाटणार नाही

SCROLL FOR NEXT