Mumbai Crime  Saam tv
Video

Mumbai Crime : अबब! कुठे १० कोटींची चांदी, कुठे लाखोंची रोकड पकडली; ऐन निवडणुकीत नाकाबंदीवेळी बेधडक कारवाई

Mumbai Crime News : ऐन विधानसभेत कोट्यवधींची चांदी जप्त करण्यात आली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ववर चांदी जप्त केली आहे. या मार्गावर कोट्यवधींची चांदी जप्त केली आहे. खालापूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. दहा कोटींपेक्षा अधिक रक्कमेची चांदी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

पिकअप टेम्पोमधून १० कोटींहून अधिक चांदीची वाहतूक होत होती. खालापूर टोलनाक्यावर चांदीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चांदीच्या वस्तू आणि विटांचा समावेश आहे. खालापूर DYSP विक्रम कदम आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मोठी कारवाई केली आहे.

भरारी पथकाने केली मोठी कारवाई

चेंबूरमध्ये भरारी पथकाने लाखोंची रक्कम पकडली. घाटकोपरहून चेंबूरच्या दिशेने ही कार येत होती. कारमध्ये तीन व्यक्ती लाखोंची रक्कम घेऊन जात होते. या वेळी एमजी रोडवर पेस्तम सागर येथील चेक पोस्टवर तपासणी केली असता हे लाखो रुपये पथकाला आढळले. पैसे आणि कार घेऊन पथक टिळक नगर पोलिस ठाण्यात दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT