MD DRUGS FACTORY BUSTED IN SATARA CRORES WORTH DRUGS SEIZED BY CRIME BRANCH Saam Tv
Video

मुंबई-पुण्यात ड्रग्स येतात कुठून? क्राईम ब्रांचची थेट या गावामध्ये जाऊन कारवाई, कोट्यावधींचं एमडी जप्त|VIDEO

MD Drugs Manufacturing Unit Busted In Satara: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये कोट्यवधींचा साठा जप्त केला असून चार जण ताब्यात घेण्यात आले आहे.

Omkar Sonawane

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात तीन कारागिरांसह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचला सावरी गावात एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज, कच्चा माल आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार येथे तयार केलेले एमडी ड्रग्ज मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये विक्रीसाठी पाठवले जात होते.

दरम्यान ज्या शेडमध्ये हा कारखाना सुरू होता त्या शेडचे मालक गोविंद शिंदकर यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एका व्यक्तीने कामगारांसाठी शेड मागितले होते आणि त्याच कारणासाठी हे शेड दिल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, या शेडमध्ये बेकायदेशीररित्या ड्रग्ज तयार केले जात असल्याची कोणतीही माहिती आपल्याला नव्हती, असेही शिंदकर यांनी स्पष्ट केले. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ड्रग्जचे नेटवर्क, त्यामागील सूत्रधार आणि वितरण साखळीचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रँचने तपास अधिक तीव्र केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार, पण कधीपर्यंत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: तरूण आपल्या देशाचे भविष्य आहेत, तरी तरुणांवर हल्ला का? - प्रियंका गांधी

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील जलसाठा ९१.४७ टक्क्यांवर, खडकवासला धरण शंभर टक्के भरले

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं २०००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Hair Care: लांब, दाट आणि सिल्की केस हवे आहेत? तांदळाच्या पाण्याचा असा करा योग्य वापर

SCROLL FOR NEXT