Mumbai Crime  
Video

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, २० वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना अटक

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. २० वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई पोलिसांच्या झोन ७ च्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या पथकाचे प्रमुख रेवणसिद्ध ठेंगळे यांच्या नेतृत्वात आज तब्बल १२ बांगलादेशी अटक केली आहे. वर्सोवाच्या खोजा गल्लीमधून या बांगलादेशींना अटक केली आहे. यात एकच कुटुंबातील १० जण आहेत.

मागील वीस वर्षांहून जास्त वर्ष भारतात घुसखोरी करून राहत होते. या बांगलादेशींनी भारतात पासपोर्ट, आधार कार्ड, इलेक्शन आयडी, पैन कार्ड , रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. रोहिमा शहाबुद्दीन खान, शकील कादर शेख, रूखसाना शकील शेख, वहीदुल फैजल खान, जस्मिन वहीदुल खान,सिमरन वहीदुल खान,हसन अब्दुल रशीद खान अब्दुल आजीज अब्दुल रशिद शेख अशी अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. यात चार महिला , चार पुरुष आणि चार लहान मुलं आहेत. काही दिवसांपूर्वी या पथकाने १३ बांगलादेशींना अटक केली होती. त्यानतंर आज ही मोठी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT