Coastal Road SaamTv
Video

Coastal Road : मुंबईकरांना प्रजासत्ताकदिनी मोठं गिफ्ट! मरिन ड्राईव्ह ते वांद्रे; १५ मिनिटांत सुसाट | Video

Mumbai Coastal Road : प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Saam Tv

अखेर कोस्टल रोड प्रजासत्ताक दिनापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत हजर होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या एका नवीन पूलाचं उद्घाटन २६ जानेवारीला होत आहे. त्यानंतर हा पूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना प्रजासत्ताकदिनी मोठं गिफ्ट मिळणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रजासत्ताक दिनापासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. तसंच कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंक जोडणाऱ्या पूलाचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या पूलाचं लोकार्पण झाल्यानंतर मरिन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त १५ मिनिटांत होणार आहे. या पूलाचं लोकार्पण २६ जानेवारीला होणार असलं तरी प्रत्यक्ष वाहतून मात्र २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. काही महिन्यांपूर्वी वरळीकडून वांद्रेकडे जाणाऱ्या वाहतुकीचा पूल लोकार्पण करून सुरू करण्यात आला होता. आता उद्या वांद्रेकडून वरळीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा पूल सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT