Mumbai News SaamTv
Video

Mumbai News : परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईतील कार्यकर्ते आक्रमक |VIDEO

Parbhani News : परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ आज राज्यात ठिकठिकाणी बंदची हाक देत आंबेडकरी अनुयायांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परभणीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आता मुंबईच्या चेंबुर भागात देखील आंबेडकरी अनुयायांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. आज सकाळपासूनच नांदेड आणि बीड बंदची हाक देण्यात आली होती. आता परभणी घटनेचं लोण हळूहळू महाराष्ट्रात सगळीकडे पसरताना दिसत आहे.

परभणी हिंसाचाराच्या घटनेनंतर एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. याच घटनेचा निषेध आंबेडकरी अनुयायांकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मुंबईच्या चेंबुर परिसरात देखील आता रास्तारोको आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. याला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. मयत सूर्यवंशी यांच्या कुटुंबास आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT