Mumbai Mayor election latest update  saam tv
Video

BMC Mayor: मुंबईतील जागांचा हट्ट पुरवला, पण भाजपला फटका बसला, शिंदेंना अडीच वर्षाचा महापौर देणार का?

Mumbai Mayor election latest update मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने महापौरपदावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केली असून भाजप ती मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Strategy On Mayor Election : मुंबई महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळले नाही. त्यामुळे महापौर कुणाचा बसणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने महापौर पदावर दावा केला आहे. अडीच वर्षांचे महापौरपद द्यावे, असा दावा शिंदेसेनेकडून करण्यात आलाय. पण भाजप शिंदेंची मागणी मान्य करणार का? मुंबईतील जागावाटपाचा हट्ट भाजपकडून पुरवण्यात आला. शिंदेंना हव्या तेवढ्या जागा दिल्या, पण त्याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे आता अडीच वर्षांचे महापौरपद देणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिंदेंनी आपले सर्व नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलेत.

महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेसेनेने मोठा डाव आखल्याचे चित्र आहे. सत्तासमीकरण मजबूत ठेवण्यासाठी शिंदे गटाच्या नगरसेवकांना मुंबई फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आले आहे. संभाव्य फुट टाळण्यासाठी आणि पक्षशिस्त कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नगरसेवकांशी थेट संवाद साधणार आहेत. या बैठकीत महापौर निवड, मतदानाची रणनीती आणि पुढील राजकीय दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या हालचालींमुळे महापौर निवडीआधीच राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनीही या घडामोडींवर लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

ZP Election : पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का, झेडपीच्या निवडणुका लागताच दिग्गज नेत्याचा भाजपात प्रवेश

Surya Gochar 2026: फेब्रुवारीमध्ये ३ वेळा गोचर करणार सूर्य ग्रह; 'या' राशींकडे दुप्पट वेगाने येणार पैसा

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Protein Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्रोटीन टाळा; या 5 गोष्टींकडे द्या लक्ष, 3 महिन्यात 10 किलो वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT