Mumbai Birth Certificate Scam: 19,734 Fake Documents To Be Cancelled, 4 Officials Suspended Saam tv
Video

मुंबईत जन्म प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! 19,734 बनावट दाखले होणार रद्द; 4 वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन

Mumbai Birth Certificate Scam: मुंबईतील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात 19,734 बनावट प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार मुंबई जिल्हा निबंधक आणि एसआयटी चौकशी करत आहेत.

Bharat Jadhav

मुंबई महानगरपालिकेत जन्म प्रमाणपत्रांचा एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक घोटाळा समोर आलाय. आतापर्यंत तब्बल 19 हजार 734 जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी राज्य सरकारनं ही प्रमाणपत्रे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या महाघोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारनं SIT स्थापन केली असून, या प्रकरणी आतापर्यंत 4 वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात 'दुरुस्ती' किंवा 'शुद्धलेखनातील दुरुस्ती'च्या नावाखाली जारी करण्यात आलेली १९,७३४ जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिलेत. भाजप नेते याप्रकरणाचा मुद्दा बराच काळापासून लावून धरला होता. या प्रकरणाशी संबंधित माहिती आणि कागदपत्रांचे अनेक कागदपत्र राज्य सरकारकडे सादर करण्यात आले होते. प्रशासनाने अखेर या मुद्द्यावर कारवाई केली आहे. प्रमाणपत्रे आणि त्याशी संबंधित प्रक्रियांची वैधता पडताळून पाहिल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांनी ही कारवाई सुरू करण्यासाठी मुंबई जिल्हा निबंधकांना निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा आक्रमक एल्गार

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT