Lalbagh Best Bus Accident VIDEO  Saam TV
Video

Best Bus Accident : मद्यधुंद प्रवाशाने स्टेअरिंग खेचलं, बेस्ट बसने 9 जणांना उडवलं; लालगबागमधील थरारक VIDEO

Lalbagh Best Bus Accident VIDEO : मुंबईच्या लालबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने धावत्या बेस्ट बसचं स्टेअरिंग खेचलं.

Satish Daud

मुंबईच्या लालबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने धावत्या बेस्ट बसचं स्टेअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बसने रस्त्यावरून जात असलेल्या 9 जणांना चिरडलं. या थरारक घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

जखमींवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बसची ६६ नंबरची बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली. यावेळी एका मद्यधुंद प्रवाशाने क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला.

वाद इतका विकोपाला गेला, की हा प्रवासी चालकाच्या कॅबिनमध्ये घुसला. त्याने थेट बसचे स्टेअरिंग खेचले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 9 जणांना चिरडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT