local train  saam tv
Video

Mumbai Local: लोकल प्रवाशांचे हाल सुरूच, एसी ट्रेनमध्ये शिरताच येईना, बंद दरवाजाची लोकल आणण्याआधी ही कसरत पाहाच...VIDEO

Shut-Door Local Trains : मुंब्रा येथे लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याने प्रवाशी हे रुळावर पडले होते. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे एसी लोकलमध्ये आता प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे.

Omkar Sonawane

मुंबईमधील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन एकीकडे घेत असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटं दरवाजा बंदच होत नव्हता. मंगळवारची ही स्थिती आजही पहायला मिळाली.

डोंबिवली स्टेशनवर एसी लोकल आल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या प्रवाशांमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. अखेर प्रवाशांना जबरदस्तीने ढकलण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना कसरत करावी लागली. मुंब्रा दुर्घटनेनंतर बंद दरवाजाच्या लोकल्स आणण्याचा विचार सरकार करतंय. मात्र बंद दरवाजाच्या लोकलमध्ये गर्दीच्या वेळी काय परिस्थिती असते हे सरकारला कधी कळणार असाच सवाल प्रवासी विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वहिनीला मिळवण्यासाठी सख्ख्या भावाचा काटा; हत्या केल्यानंतरही चेहऱ्यावर हसू,'त्या' क्रूर कृत्याने पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा

Pune Crime: क्षुल्लक कारणांवरून वाद; पुण्यात रागाच्या भरात पतीनं पत्नीला संपवलं, दीड महिन्यांच्या चिमुकल्यापासून आईचं छत्र हरपलं

बीडमध्ये पुन्हा अपहरणाचा थरार; दिवसाढवळ्या तरुणाला कारमध्ये बसवून पळवलं, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Push-Ups Fitness Test: तुमच्या वयानुसार किती पुश-अप्स मारले पाहिजेत? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती, वाचा

SCROLL FOR NEXT