Mulund News SaamTv
Video

Mulund News : मराठी कुटुंबाला वापरली अर्वाच्य भाषा; परप्रांतीय कामगाराला मनसेस्टाईल चोप | Video

MNS activists : मुलंडमध्ये एका फूड स्टॉलच्या परप्रांतीय कामगाराने मराठी कुटुंबाला अरेरावी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता या कामगाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे स्टाईल चोप दिला आहे.

Saam Tv

मुलंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीयाला चोप दिला आहे. मराठी कुटुंबाला या परप्रांतीयाने अरेरावी केल्याने त्याला चोप देण्यात आला आहे. हा परप्रांतीय मराठी कुटुंबाच्या अंगावर धावून देखील गेला होता. या प्रकरणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

ठाणे येथे राहणाऱ्या मानसी मेगे व त्यांच्या आई मुलुंड येथे बँकेच्या काही कामासाठी आल्या होत्या. काम झाल्यावर मुलुंड पश्चिम येथे फास्ट फूड कॉर्नरवर गेल्या असता, तिथल्या कामगाराने त्यांच्याशी हुज्जत घालत ऐपत नाही तर कशाला खायला आलात इथे ? असा उद्धटपणा करत शिवराळ भाषेचा वापर केला. मुलीने जाब विचारला तर तिच्यावर आरडाओरड केली. मुलीची आई मध्यस्थी करायला गेली असता तिच्या अंगावर घावून आले. अशा प्रकाराने घाबरलेल्या आईने व मुलीने न्याय मिळावा म्हणून मनसे जनसंपर्क कार्यालय गाठले. त्यानंतर मुलुंड मनसेचे पदाधिकाऱ्यांनी फूड कॉर्नरवर जाऊन या कामगाराला मनसे स्टाईलने चोप देऊन ाफी मागायला लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

Kandyachi Bhaji Recipe : झणझणीत कांद्याची भाजी, पोळीसोबत लागेल टेस्टी

Satara Tourism : साताऱ्यात ‘हिडन जेम्स’ शोधताय? मग ही 6 ठिकाणं मिस करू नका!

SCROLL FOR NEXT