Ladki Bahin Yojana news Saam tv
Video

Ladki Bahin Yojana : लाडकीला एप्रिलचा हफ्ता कधी? ₹१५०० येणार की, २ महिन्याचे ₹३००० जमा होणार?

Ladki Bahin Yojana April Payment Delayed : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिलचा ₹1500 हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. एप्रिल-मे महिन्यांचे पैसे एकत्र येणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana April 2025 update : महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींना एप्रिल महिन्याच्या १५०० रूपयांची प्रतिक्षा आहे. ३० एप्रिल रोजी महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता येईल, असा अंदाज वर्तवला होता. पण अद्याप तरी लाडकीच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्र ३ हजार रूपये लाडकीच्या खात्यात येणार का? अशीही चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांना जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील ९ हप्त्यांचे पैसे वितरित झाले आहेत. दरम्यान, एप्रिल हप्त्याच्या वितरणाची नेमकी तारीख आणि इतर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते तपासत राहावे आणि कोणत्याही तांत्रिक अडचणी असल्यास नारी शक्ती दूत ॲप किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT