MPSC main Exam 2025 timetable saam tv
Video

MPSC Exam Date : एमपीएससी मुख्य परीक्षेच्या तारखा बदलल्या, नवं वेळापत्रक बघा

MPSC Main Exam Date Timetable : राज्य लोकसेवा आयोगानं मुख्य परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. यासंबंधीचं सुधारित पत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केलं आहे. कधी होणार परीक्षा, जाणून घ्या व्हिडिओमधून....

Nandkumar Joshi

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची पूर्व परीक्षा २०२४ च्या निकालानंतर ३१८ उमेदवार पात्र ठरले होते. त्यांची मुख्य परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. मात्र, आता त्यात बदल करण्यात आला आहे. एमपीएससी पूर्व परीक्षा २०२४ च्या सुधारित निकालानुसार, नव्याने ३१८ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यामुळे २६ ते २८ एप्रिल २०२५ ला घेण्यात येणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशा मागणीची निवेदने उमेदवारांकडून आयोगाकडे देण्यात आली होती.

उमेदवारांकडून आलेली निवेदने आणि इतर सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य परीक्षा २०२४ सुधारित वेळापत्रकानुसार २७, २८ आणि २९ मे २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेच्या तारखांमध्ये केलेल्या सुधारणांबाबतचे पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

Mumbai Crime : 80 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रेमाचं खुळ शिरलं; ४ महिलांवर मन जडलं, नको त्या नादात गमावले 9,00,00,000 रुपये

Maharashtra Live News Update: सोळा वर्षीय मुलाच्या तत्परतेमुळे दहा वर्षीय मुलाचा नदीत बुडताना वाचवला जीव

Shruti Marathe: मोकळे केस अन् गालावरची गोंडस खळी...

Shocking : रक्षाबंधनासाठी गावी आला, शेतात फिट आली अन् नाल्यात कोसळला; तरुण इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT