Sanjay Raut Press Conference SaamTv
Video

MVA News : मविआमधील बंडखोरांबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती | VIDEO

MP Sanjay Raut News : महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांतील बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरांची भूमिका नेमकी काय असेल, याबद्दल खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

Saam Tv

मागील 4 दिवसांत महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी आपापल्या बंडखोर नेत्यांशी संपर्क साधला. त्यानुसार आज महाविकास आघाडीचे सर्वच बंडखोर आपली उमेदवारी मागे घेणार असल्याचा ठाम विश्वास सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यासंबंधीचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, अलिबाग, पनवेल व पेण या 3 जागा महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या असून या तिन्ही जागांवरील आमचे उमेदवार माघार घेतील, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 'आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मागील 4 दिवस महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष आपापल्या अर्ज भरलेल्या उमेदवारांशी संपर्क साधला. काल दिवसभर आम्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आताच माझी माकप नेते कॉम्रेड कराड यांनी भेट घेतली. त्यांनी नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरला आहे. आम्ही त्यांना माघार घेण्याची विनंती केली. माझा मैत्रीपूर्ण लढतीवर विश्वास नाही. आमच्यात कुठेही एकमेकांशी लढत होणार नाही असं आमचं ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व नाना पटोले आपापल्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न यशस्वी होत आहे. एखाद-दुसरा अर्ज राहिला, तर तो ही मागे घेण्याचा आमचा प्रयत्न असेल', असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT