Sanjay Raut News SaamTv
Video

VIDEO : मोदींच्या काळात कोणीच सेफ नाही; ‘एक है, तो सेफ है’ नाऱ्यावर राऊतांनी घेतला मोदींचा समाचार

Sanjay Raut News Update : आमचं कुटुंब फोडण्याचं काम मोदी आणि शहा यांनी केलं आहे. एक है तो सेफ है वगैरे काहीही नाही, त्यांच्या काळात कोणीच सेफ नाही, अशी विखरी टीका खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

Saam Tv

मोदींच्या काळात कोणीच सेफ नाही. शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीतील आमच्या सहकाऱ्यांना मोदी आणि शहा यांनी वेगळं केलं. त्यामुळे आपण काय बोलत आहोत हे त्यांनी समजून घ्यावं, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत ‘एक है तो सेफ है’ हा नारा दिला आहे. त्यावर शनिवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी मोदींवर टिकास्त्र डागलं.  

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनेमध्ये आमचं कुटुंब फोडण्याचं काम मोदी आणि शहा यांनी केलं. त्यामुळे एक आहे तर सेफ आहे वगैरे काही नाही. आता तुम्ही 23  तारखेनंतर सेफ रहा इतकच मी सांगेल. शिवसेनेतील सहकाऱ्यांना मोदींनी वेगळं केलं. राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनीच वेगळं केलं. मग आता 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' असं बोलण्याची वेळ त्यांच्यावर कशी आली? असा सवाल उपस्थित करत, आम्ही आमच्या महाराष्ट्रात सेफ आहे. फक्त मोदी आणि शहा आल्यावरच आम्हाला अनसेफ वाटतं, अशी घणाघाती टीका देखील यावेळी संजय राऊत यांनी केली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT