Sandipan Bhumre SaamTv
Video

Sandipan Bhumre : लोकसभेला झालं तेच विधानसभेत होईल, संदिपान भूमरेंनी व्यक्त केला विश्वास

Chh. Sambhajinagar News : शिवसेना शिंदे गटाकडून आज संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संदिपान भूमरे देखील उपस्थित होते.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आज शिवसेनेचे संजय शिरसाठ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी क्रांती चौकातून रॅली काढली. या रॅलीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाय खासदार संदिपान भुमरे हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी संदिपान भुमरे यांनी जे लोकसभेला झालं तेच विधानसभेला होईल, विजय आमचाच असेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून देखील आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करून अर्ज भरण्यात आला. त्यावरही भूमरे यांनी प्रतिक्रिया देत आम्हाला शक्तीप्रदर्शनाची गरज नाही. जनतेचा आणि यांच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. संभाजीनगरमध्ये आम्हीच विजयी होऊ असंही भूमरे यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT