MP Sandipan Bhumre Driver Javed Rasool Saam Tv News
Video

संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला १५० कोटींची जमीन गिफ्ट, मात्र ड्राव्हयरने सांगितलं वेगळचं सत्य

MP Sandipan Bhumre Driver Javed Rasool : हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जावेद रसुल यांना ही जमीन गिफ्टमध्ये दिल्याचं समोर आलं आहे. ही मालमत्ता भेट म्हणून जावेद रसुलला मिळाली त्याची अंदाजे किंमत १५० कोटी आहे.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडे १५० कोटी किंमत असलेली जमीन असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे खासदार आहे, तर त्यांचे सुपुत्र विलास भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. जावेद रसुल हे मागिल अनेक वर्षापासून त्यांचे ड्रायव्हर आहेत. हैदराबाद येथील सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने जावेद रसुल यांना ही जमीन गिफ्टमध्ये दिल्याचं समोर आलं आहे. ही मालमत्ता भेट म्हणून जावेद रसुलला मिळाली त्याची अंदाजे किंमत १५० कोटी आहे. या प्रकरणी परभणी येथील एका वकिलाने तक्रार केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं या जमिनीची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात संदीपान भुमरे आणि विलास भुमरे हे पिता पुत्र अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्व प्रकणावर जावेद रसुलला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या वडिलांचे आणि हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाचं जुने कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मला ही जमीन गिफ्ट म्हणून मिळाली आहे. त्यात संदिपान भुमरे किंवा विलास भुमरे यांचा काही संबंध नाही. माझी चौकशी करण्यात आलेली आहे. माझ्या जवळचे सगळे डॉक्युमेंट्स मी दिलेले आहेत, त्यामुळे जे आरोप करतात ते चुकीचे आहेत', असं ड्रायव्हर जावेद रसुल यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती भागातील तीन एकर जमीन हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाने खासदार संदिपान भुमरे यांचे ड्रायव्हर जावेद रसुल यांना दिली होती. त्या जमिनीची सध्याची बाजार भावाची किंमत ही कोट्यावधीमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Pooja Sawant: असं सौंदर्य पाहिलं अन् मनात काहूर माजलं

Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

SCROLL FOR NEXT