Amol Kolhe Speech SaamTv
Video

VIDEO : हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात अमोल कोल्हेंचं मोठं विधान

Amol Kolhe : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भाषणात मोठं विधान केलं आहे.

Saam Tv

ही विजयाची सभा आहे. जनतेचे आभार मानतो हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली आणि महाराष्ट्रामध्ये कधी न दिसलेली गोष्ट ही प्रत्येकाच्या तोंडी आली. याआधी केवळ वस्तु विकत घेता येतात हे माहिती होत. मात्र आमदार आणि मंत्रीसुद्धा विकत घेता येतात हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्रने पाहिलं. असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. इंदापूरमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटात पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. ''हर्षवर्धन पाटील यांनी स्वाभिमानाची निवडणूक लढण्यासाठी विजयाची, महाराष्ट्र धर्माची तुतारी हाती घेतली आहे. ज्यांनी जखम दिली त्यांना सुट्टी नाही.'' अशा शब्दांत त्यांनी या पक्षप्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'तेव्हा 40 आमदार गेले म्हणून पक्ष कसा टिकणार असं वाटत असताना आता 1600 इच्छुकांनी आमदारकीसाठी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळं शरद पवार यांच्या हिमतीने शक्य झालं असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

SCROLL FOR NEXT