Mock drill saam tv
Video

Mumbai Mock Drill: मुंबईत मॉकड्रीलला सुरूवात; कुर्ला एलटीटी स्टेशनवर परिस्थिती काय? पाहा व्हिडिओ

Mumbai's LTT Station Under High Alert: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. यानंतर भारत सरकारने देशाच्या प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिल्यानंतर आज मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मॉक ड्रिल पार पडले.

Omkar Sonawane

कुर्ला लोहमार्ग टर्मिनस (एलटीटी) हे मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचे स्थानक असून, येथून विविध लांब पल्ल्याच्या गाड्या देशभरात सुटतात. या पार्श्वभूमीवर स्थानकाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने रूट मार्च सुरू करण्यात आला आहे.या रूट मार्चचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे संपूर्ण स्थानकाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेणे. यामध्ये आरपीएफसह डॉग स्क्वॉडचाही समावेश असून, संपूर्ण स्टेशन परिसरात तपासणी केली जात आहे.

मुंबईतील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, त्यानंतर भारताने त्याचे योग्य प्रत्युत्तर देखील दिले. त्यामुळे अशा संवेदनशील ठिकाणी अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक ठरतं.

रूट मार्चदरम्यान सशस्त्र जवानांच्या मदतीने संपूर्ण स्थानक परिसरात गस्त घालण्यात येत आहे. यामध्ये सध्याची सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, त्याचा आढावा घेतला जात आहे. तसेच, आणखी कोणती व्यवस्था मजबूत करता येईल, याचाही अभ्यास आरपीएफमार्फत केला जाणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT