Walmik Karad Saam TV
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडच्या कारागृहातील फोनचा पोलिस सीडीआर तपासणार | VIDEO

Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात एक मोबाईल फोन आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या मोबाइलचा सीडीआर काढावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात एक मोबाईल फोन आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. २३ जुलै रोजी रफिक खुर्शिद सय्यद या कैद्याकडे एक छोटा मोबाईल आढळून आला, ज्यानंतर त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या मोबाईलचा वापर कोणत्या उद्देशासाठी करण्यात आला याचा तपास करण्यासाठी पोलीस मोबाईलचा सीडीआर काढणार आहेत. या संदर्भात संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, बीड कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड देखील बंदिवासात आहे. त्यामुळे या मोबाईलचा कराडशी काही संबंध आहे का, यावर सध्या संशय व्यक्त केला जात आहे. धनंजय देशमुख यांनी मोबाईलचा सीडीआर काढण्याची मागणी करत या घटनेचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT