Gunaratna Sadavarte saam tv
Video

Gunaratna Sadavarte: मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्ते यांची मराठीवरून खडाजंगी, कॉल रेकॉर्डिंग वायरल, VIDEO

MNS action on Marathi language: अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि मनसे प्रवक्ते यांच्यात मराठीच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली आहे.

Omkar Sonawane

गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मुंबईतील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठीचा वापर होतोय का नाही असे यांची चौकशी मनसैनिकांनी करावी असे आदेश राज ठाकरेनी दिले होते . यावरच मनसैनिक मुंबईतल्या ठिकठिकाणी बँकात जाऊन अधिकाऱ्यांना आवाहन करत आहे आणि जर मराठीचा वापर झाला नाही तर मनसे स्टाईलने त्याचे उत्तर दिले जाईल असा देखील इशारा देण्यात येत आहे. यावरच गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी मराठी, हिंदी, इंग्रजीत बोलेल मेरी मर्जी! त्यामुळे भाषांना कोणीही प्रतिबंध आणू शकणार नाही बॅरिकेटिंग करू शकणार नाही. भाषा असू शकते अर्जबाजाराची. भाषा हीच बोलले पाहिजे तीच बोलले पाहिजे अशी सक्ती असू शकत नाही हे याबाबत आम्ही माननीय आयुक्तांना निवेदन दिले असून कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच यानंतर मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे, मात्र, या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT