Raigad MNS Saam Tv
Video

Raigad News: परप्रांतीयाची पुन्हा मुजोरी, रायगडमध्ये मनसैनिकांनी तरुणाला शिकवला धडा| VIDEO

Raigad MNS: रायगडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुजोरी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला चांगलाच चोप दिला. स्थानिक नागरिकांना त्रास देणाऱ्या या तरुणाला मनसैनिकांनी मारहाण करत धडा शिकवला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

परप्रांतीयांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. रायगडमध्ये मुजोर परप्रांतीयाला मनसैनिकांना चांगलाच चोप दिला आहे. स्थानिक नागरिकांना दमदाटी आणि आरेरावी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी धडा शिकवला आहे. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये ही घटना घडली आहे. मनसौनिकांनी या तरुणाला चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रायगडमध्ये मनसैनिकांनी परप्रांतीय तरुणाला चोप दिला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. श्रीवर्धन येथे पुनिर गौरव या नावाने निर्माण होणाऱ्या रहिवाशी सोसायटीमधील परप्रांतिय कामगार स्थानिकांना दमदाटी, हुल्लडबाजी करत होता. रहिवाश्यांनी यासंदर्भात मनसेकडे तक्रार केली होती.

त्यानंतर संतप्त झालेल्या मनसैनिकांनी पुनिर गौरवच्या कार्यालयात जाऊन परप्रांतीय कामगाराला जाब विचारला. यावेळी त्याने पुन्हा उद्धट उत्तरं दिली. तेव्हा संतापलेल्या मनसैनिकांनी या कामगाराच्या कानशिलामध्ये लगावत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला सर्वांची माफी देखील मागायला लावली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT