Nalasopara  Saam tv
Video

Nalasopara News : नालासोपाऱ्यात मनसैनिकांचा राडा; महिला कार्यकर्त्यांकडून शाळेच्या संचालिकेला मारहाण, व्हिडिओ

Nalasopara Latest News : नालासोपाऱ्यात एका शाळेत मनसैनिकांनी राडा केला. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिकेला मारहाण केली.

Vishal Gangurde

नालासोपाऱ्यात शाळा संचालिकेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दाखला न दिल्याने मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळा संचालिकेला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी शाळेत गोंधळ आणि तोडफोड केली. यावेळी शाळेत आलेल्या मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना शाळा संचालिकेनेही चप्पल फेकून मारली. त्यानंतर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळा संचालिकेला मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

शाळा संचालिकेने काय सांगितलं?

'आम्ही सांगतो होतो की, आम्ही विद्यार्थ्यांना घरी निकाल देऊ शकतो. त्यांच्या घरी निकालाची प्रत पाठवू शकत नाही. मनसेचा गोंधळाची आम्हाला कल्पना नव्हती. ११ वीच्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. यासाठी आमच्या शिक्षकांनी त्यांना अर्ज घेऊन या, आम्ही शाळा सोडल्याचा दाखला देतो, असं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. मला देखील मारहाण केली, असे शाळा संचालिकेने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

तळलेले की उकडीचे? गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणते मोदक बेस्ट, जाणून घ्या

आमच्या जवळच्या लोकांवर चौकशा का? जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT